धाराशिव (प्रतिनिधी) - शैक्षणिक वर्षात इयत्ता 11 व 12 वी विज्ञान शाखेत शिकणा-या व सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणा-या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील विदयार्थ्याना जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे.
जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विदयार्थ्यांनी तात्काळ समितीकडे संपुर्ण कागदपत्रांसहित अर्ज सादर करावेत.विदयार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र पुढील शिक्षणासाठी वेळेत मिळेल.विदयार्थ्यांनी www.barti.Maharashtra.gov.in <http://www.barti.Maharashtra.gov.in> या संकेतस्थळावर विदयार्थ्यांसाठी असलेला जात पडताळणीचा अर्ज ऑनलाइन भरावयाचा आहे.त्याची प्रिंट आऊट काढून घ्यावी.आवश्यक ते सर्व शैक्षणिक,महसुली पुरावे आणि साक्षांकित प्रती जोडून अर्ज जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, धाराशिव कार्यालयात समक्ष सादर करावा. येताना सर्व मुळ कागदपत्रे आणावीत.असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉ.बी.जी.पवार यांनी केले आहे.