परंडा (प्रतिनिधी) - येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथे दिनांक 19 व 20 जानेवारी 2024 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने युज ऑफ चाटजीपीटी या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून कृषी विद्यापीठ परभणी येथील डॉ संतोष कदम हे उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव व प्रमुख पाहुणे म्हणून श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर उपस्थित राहणार आहेत या कार्यशाळेसाठी देशभरातून अनेक संशोधक प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी डॉ अमेय पांगारकर प्रो. ट्रेनर इंटरनॅशनल टी इ डी एक्स स्पीकर डिजिटल अँड या आय बेस्ड मार्केटिंग कन्सल्टंट डेकोरेट इन डिजिटल मार्केटिंग यांचे इंट्रोडक्शन टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड चाट जीपीटी अँड टेक्नॉलॉजी या विषयावर सकाळी व अपलिकेशन ऑफ ये आय टूल्स अँड चाट जी पी टी या विषयावर दुपारच्या सत्रामध्ये व मार्गदर्शन होणार आहे.
दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी युज ऑफ ए आय अँड टेक्नॉलॉजी क्लासरूम टीचिंग या विषयावर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी श्री भूषण कुलकर्णी प्रो ट्रेनर नॉलेज ब्रिज फाउंडेशन अहमदनगर आणि श्री एकनाथ कोरे ऍडमिनिस्ट्रेटर नॉलेज ब्रिज फाउंडेशन अहमदनगर हे उपस्थित राहणार आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिव या उपकेंद्राचे प्रभारी संचालक डॉ प्रशांत दीक्षित हे दुसऱ्या दिवशी समारोप समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव या राष्ट्रीय कार्यशाळेचे संयोजक ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख तथा सहसंयोजक डॉ महेश कुमार माने यांनी केले आहे.