धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली  शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने भक्ती शक्ती संवाद यात्रा काढण्यात आली आहे. यात्रेत तिसऱ्या दिवशी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय (महाराज) भोसले यांनी दि. 27 डिसेंबर रोजी सकाळी तुळजापूर येथे शक्तीदेवता, कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन धाराशिव जिल्ह्यातील मठ, मंदिर, धार्मिक स्थळांमध्ये भक्ती शक्ती संवाद यात्रेस प्रारंभ केला.

यावेळी पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या संपर्क कार्यालयास भेट देऊन श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा, दर्शन मंडप, प्रवेशद्वार याबाबत चर्चा केली. तसेच पुजाऱ्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. त्यांचे पौरोहित्य पुजारी विनोद सोंजी कदम यांनी केले. 

यावेळी जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, मोहन पणुरे, ज्ञानेश्वर घोडके, संभाजी पलंगे, बापू भोसले, सुरज कोठावळे,  खंडू कुंभार, मोहन भोसले, अभिजित अमृतराव, अमरराजे कदम उपस्थित होते.


 
Top