धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कर्मचारी संघटनेचे विविध मागण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संघटनेच्या वतीने अनेक अर्ज ही देऊन सुद्धा त्या अद्याप पर्यंत कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे त्यांच्या मागण्या पुढील सहाय्यकारी आहेत की स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अहर्ताकारी 1 ली परिक्षा पास झालेली असून ज्याची सेवा दहा वर्ष पूर्ण झालेले आहे अशा सर्व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ देण्यात यावा. ज्या स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यकांची दहा वर्षे नियमित सेवा झाली आहे अशा सर्व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ देण्यात यावा मागील एक वर्षापासून मासिक प्रवास भत्त्याची रक्कम देण्यात आलेली नाही ती तात्काळ देण्यात यावी. आयत्यावेळी कार्यक्रमाला आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचे काही प्रश्न निर्माण झाल्यास त्याही प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावी. या जर मागण्या मान्य झाल्या नाही त्या तर येणाऱ्या काळात सर्व कर्मचारी आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

संघटनेचे अध्यक्ष अरुण मुंडे, सरचिटणीस उद्धव महानोर, कोषाध्यक्ष रमेश मासाळ यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव सार्वजनिक बांधकाम विभाग बीड येथून सर्व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर कार्यरत असलेले कर्मचारी उपोषणास उपस्थित आहेत.


 
Top