धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यात बँकेवर दरोडा घातल्याची घटना ताजी असतानाच दरोडयाची तयारी करणाऱ्या 8 जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत माहिती अशी की, आरोपी अजय दत्तात्रय पुरबुज, आदित्य विजय धवन, सुमित सुसाबंड, स्वप्नील जानकीराम तावरे, रितेश प्रभाकर वडमारे, सर्व राहणार बीड, युवराज पांडुरंग लहाणे, सुमित बाबासाहेब शेजवळ, अमोल सुधाकर आढाव सर्वजण राहणार छत्रपती संभाजीनगर. हे सर्वजन दि.26 डिसेंबर रोजी पहाटे 04.10 ते 06.20 वाजण्याच्या सुमारास एन.एच 52 रोडवरील उंदरे यांचे पेट्रोल पंपाजवळ रोड लगत पारगाव शिवारात दरोड्याचे साहित्यासह तीन चाकी रिक्षा क्र. एमएच 23 ए. आर. 1019 मध्ये येवून. कोणते तरी मालाविषयी अथवा येणारे जाणारे वाहनावर गंभीर स्वरुपाचा दरोड्यासारखा गुन्हा करण्याचे उद्देशाने एकत्र आले. स्वत:चे कब्जात एक पिस्टल कट्टा, दोन लोखंडी कोयते, लोखंडी सळई, लोखंडी पाईप, रोख रक्कम 10 हजार 840 रूपये असा सर्व मिळून 1 लाख 68 हजार 840 रूपये किंमतीच्या साहित्यासह दरोडा टाकण्याचे तयारीने एकत्र जमून थांबलेले वाशी पोलीसांना मिळून आले. अशा मजकुराच्या फिर्यादी नवनाथ भारत सुरवसे, वय 35 वर्षे, नेमणुक पोलीस ठाणे वाशी जि. धाराशिव यांनी दि.26 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पोलिस ठाणे येथे कलम 399,402 भा.दं.वि.सं. सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 4/25 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.



 
Top