धाराशिव (प्रतिनिधी)- प्रा.दत्तात्रय लांडगे उपशिक्षण अधिकारी यांचा सत्कारजिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग धाराशिव उपशिक्षणधिकारी म्हणून रुजू होऊन प्रा. दत्तात्रय लांडगे यांनी पदभार स्विकारला. यावेळी मुप्टा शिक्षक संघटनेच्या वतीने उपशिक्षणाधिकारी प्रा.लांडगे यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या उपशिक्षणाधिकारीपदाच्या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेले प्रा.दत्तात्रय लांडगे यांनी जिल्हा परिषद माध्यमिक विभाग धाराशिव येथे उपशिक्षणाधिकारी पदभार स्विकारला. याआधी ते नेकनुर ता.जि.बीड येथील शासकिय आध्यापक विद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. तसेच बीड जिल्हा परिषद येथे विज्ञान पर्यवेक्षक म्हणून त्यांनी यापूर्वी काम केले आहे. यावेळी मुप्टा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. रवि सुरवसे ,जिल्हा सचिव मारुती पवार ,जिल्हा संघटक प्रा. अंबादास कलासरे, अमोल गडबडे ,शिक्षण विस्तार अधिकारी माळी, बालाजी तांबे हे ही उपस्थित होते.