भूम (प्रतिनिधी)-श्री क्षेत्र आयोध्या येथुन आलेल्या अक्षता आज भूम येथील श्री राम मंदिर कसबा येथे श्री रामाची आरती करुन अक्षता अभिमंत्रित करण्यात आल्या . भूम तालुक्यातील शहरातील मंगल अक्षता वितरण संपर्क अभियान अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वाटप कराव्यात असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहकार्य अजय जानराव यांनी केले .

गुरुवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी श्री क्षेत्र आयोध्या येथुन आलेल्या अक्षता आज भूम येथील श्री राम मंदिर कसबा येथे श्री रामाची आरती करुन अक्षता अभिमंत्रित करण्यात आल्या .  मंदिरात श्री रामाची आरती जनसेवा बँकेचे चेअरमन श्रीराम मुळे सपत्नीक यांच्या हस्ते  करण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा सहकार्यवाह अजय जानराव, धर्म जागरणचे विजय वाघमारे, सचिन  क्षीरसागर, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, भूम शहर अध्यक्ष शंकर खामकर, शहर सरचिटणीस हेमंत देशमुख , अ.जा.ज.शहर अध्यक्ष प्रदीप साठे, कामगार तालुका अध्यक्ष सचिन बारगजे, तालुका उपअध्यक्ष बाबासाहेब वीर, जेष्ठ नेते चंद्रकांत गवळी,  युवा शहर अध्यक्ष सुजित वेदपाठक, ब्राह्मण संघटना तालुकाध्यक्ष सुधीर देशमुख ,भूम शहर अध्यक्ष संजय शाळु, बाळासाहेब खुळे, सुमंतराव देशमुख, प्रवीण आघोर, राहुल जोशी, मनोज क्षीरसागर ,आदि परिसरातील महिला, पुरुष, बालके उपस्थित होते.


 
Top