भूम (प्रतिनिधी)-सूर्योदय अपंग विकास मंडळ भूम परंडा वाशी यांच्यावतीने तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय उत्कृष्ट काम केलेल्यांचा सन्मान सोहळा कार्यक्रम शनिवार दि.9 डिसेंबर 2023 रोजी यश मंगल कार्यालय भूम येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार राहुल मोटे व कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. राहुल घुले यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी भूम परंडा, वाशी, धाराशिव येथील शेकडो दिव्यांग व पदाधिकारी उपस्थित होते. समाज हितासाठी दोन राहुल एकत्र आल्याबद्दल लोकांनी आनंद व्यक्त केला.

या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर राहुल घुले यांनी दिव्यांग बांधवांसाठी व इतरांसाठी मोफत उपचारासाठी चालू केलेली भुम डहाणू हि बस बंद झाली असल्याने खाजगी बसने नेवून उपचार करणार असल्याचे सांगितले. या मेळाव्यात भूम, परंडा, वाशीतील लोकांसाठी  राहुल मोटे व आपण एकत्र काम करु अशी ग्वाही यावेळी डॉ. राहुल घुले यांनी दिली.

यावेळी हनुमंत पाटुळे, मधुकर मोटे, गौरी शंकर साठे,तात्यासाहेब गोरे, संजय पवार, राहुल बनसोडे, नानासाहेब पवार, संजय पाटील, नानासाहेब तनपुरे, महेश ठोंगे, आबासाहेब मस्कर, संतोष सुपेकर, ठाकरे गट महिला जिल्हा प्रमुख झीनत सय्यद, श्रीगणेश चोबे, चंद्रमणी गायकवाड, प्रवीण खटाळ, भाऊसाहेब चोरमले, काकासाहेब चव्हाण, भगवान ढगे आदी उपस्थित होते.

यावेळी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी, समाजिक, कामगार, शेतकरी, कष्टकरी, यांचा सुर्योदय अपंग विकास मंडळ संचलित महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेच्या वतीने ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थापक अध्यक्ष प्रदीप डोके यांनी केली. तर सुत्रसंचलन आलिम शेख यांनी केले. आभार, रामहरी चव्हाण यांनी मानले.


 
Top