भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील हिवर्डा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री दत्त जयंती महोत्सव साजरा होत असून यावेळी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री क्षेत्र दत्त संस्थान या ठिकाणी दिनांक 20 डिसेंबर ते 27 डिसेंबर पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह महंत बाजीराव महाराज शास्त्री दत्त संस्थान हिवर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. 

दिनांक 20 डिसेंबर रोजी हभप कल्याण महाराज काळे विनोदाचार्च शेवगांव, हभप तुकाराम महाराज मुंडेशास्री परळी, हभप प्रकाश महाराज साठे विनोदाचार्य धारूर, हभप लक्ष्मण महाराज मेंगडे संस्थान नेकनुर, हभप जयवंत महाराज बोधले पंढरपूर, हभप अजिनाथ महाराज लाड आळंदी, हभप हरिआबा गिते दिघोळ यांचे किर्तन, हभप रामदास काका महाराज सामनगांवकर यांच्या शुभ हस्ते प्रारंभ  होणार आहे. व्यास पिठचालक  म्हणून ह.भ.प सतिश महाराज वालवडकर, शाम महाराज राख बीड, हरिपाठ जय भगवान भजनी मंडळ हिवार्डा तसेच या ठिकाणी सो कमल भिमराव घुले मल्टी स्पेशालिटी चॉरिटेबल टुस्ट डॉ. राहूल घुले यांच्या मार्फत दि. 26 डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषध उपचार केले जाणार आहेत. सांगता करते वेळी काल्याचे सुश्राव्य किर्तन ह.भ.प न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री महंत भगवानगड यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. दि. 20 डिसेंबर ते 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाचा भावाकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महंत बाजीराव महाराज शास्त्री दत्त संस्थान हिवर्डा यांनी केले आहे.


 
Top