धाराशिव (प्रतिनिधी)-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येत्या बुधवार 6 डिसेंबर 2023 रोजी प्रसेना प्रतिष्ठाणच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सकाळी 9 ते 5 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरात मागील 15 वर्षांपासून प्रसेना प्रतिष्ठानच्या वतीने महापरिनिर्वाण दिना निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. रक्तदानासारखे सर्वश्रेष्ठदान कुठलेही नाही. त्यामुळे महापरिनिर्वाणदिनी रक्तदान करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याच्या या सामाजिक उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रसेना प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक चे शहराध्यक्ष संदीप बनसोडे यांनी केले आहे.