तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत अमंली पदार्थांचा शिरकाव होत असुन तो रोखावा व बरबाद होणारी युवा पिढी वाचववी अशी मागणी शहरवासियांमधुन केली जात आहे. तिर्थक्षेञ तुळजापूरात कधीही अंमली पदार्थाचा शिरकाव होत नव्हता माञ मागील दोन वर्षापासून याचा शिरकाव वाढला आहे. यामुळे तिर्थक्षेञ तुळजापूर ची शांतता धोक्यात येण्याची मोठी शक्यता आहे.

: शहरातील युवापिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जावु लागली आहे.नशा आणणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यसनाच्या विळख्यात तरुण जावु लागण्याचा मार्गावर आहे. अमली पदार्थ नशा करणारे तरुन घरातील मंडळीचे ऐकेनासे झाले आहेत. हे अमली पदार्थाचा आहारी जावुन हिंसक बनण्याची मोठी शक्यता आहे.. व्यसनामुळेअनेक तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीकडे ओढले जाण्याची शक्यता आहे. व्यसनाधिनतेमुळे अनेकांचे संसार मोडण्याचा मार्गावर आहेत. व्यसनामुळे घराघरांत भितीचे दहशतीचे वातावरण तयार झाले. नशेच्या जाळ्यात अडकल्या तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. तरी अमली पदार्थ शहरात पोहचु नये यासाठी दक्षता घेणे तिर्थक्षेञ तुळजापूरची शांतता अबाधित राहण्यासाठी काळाची गरज बनली आहे.


 
Top