तुळजापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ नाताळ सुट्यांन पार्श्वभूमीवर शालेय सहलींमुळे विध्यार्थांंची गर्दी वाढू लागली आहे. यामुळे श्रीतुळजाभवानी मंदीर परिसर , शालेय विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलली आहेत. दिवाळी सुट्टीनंतर सुरू झालेल्या शाळा-महाविद्यालयांमध्ये हिवाळी हंगामातील सहलींचे नियोजन सुरू झाले होते . राज्यातील विविध जिल्ह्यातून शेकडो विद्यार्थी शालेय बस व एस. टी. महामंडळांच्या वाहनातून तुळजापूरात येऊ लागले आहेत. सात वर्षाचा चिमुकल्या पासुन विद्यार्थीं विद्यार्थींनी रांगेत मंदिरात जात असून, जाताना आई राजा उदो उदो सदा नंदीचा उदो उदो, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा स्वयस्फुर्तीने देत आहे. चिमुकल्यांना मंदिरात गर्दीत सांभाळताना शिक्षक वृध्दांना कसरत करावी लागत आहे.
शालेय सहलीतील विद्यार्थ्यांना मंदीर समिती थेट दर्शन घडवत असल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर येथे शालेय सहलीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या दररोज आठ ते दहा शालेय सहली येत असुन कर्नाटक राज्यातील शालेय सहली तिर्थक्षेञी येत आहेत. हिवाळी हंगामातील शाळा-महाविद्यालयांच्या सहलींना सुरुवात झाली आहे. देवीदर्शनानंतर शालेय विद्यार्थीं आवर्जून देविचा प्रसाद म्हणून चुरमुरा, हळदीकुंकु, पुढे घेत आहे. या चिमुकल्या विद्यार्थांना सुरक्षारक्षक पुजारी ओढाओढ न करता स्वता जातीने लक्ष घालुन देवि दर्शन घडवत आहेत. देवीदर्शन होताच चिमुकले मंदिरात प्रदक्षणा मार्गावर ठाण मांडुन बसत आहे. संपुर्ण मंदिर विद्यार्थीं पहात आहे. शालेय विध्यार्थांच्या सहलीचे श्रीतुळजाभवानी दर्शनामुळे सार्थक होत असल्याने शालेय सहलीत तिर्थक्षेञ तुळजापूर म्हटले कि पालक आवर्जून विद्यार्थांना सहलीसाठी पाठवत असल्याचे शिक्षक वृंद सांगत आहेत.