भूम (प्रतिनिधी)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाद कोणी करू नये, तीन राज्यात सत्ता आली. आता आगामी लोकसभा निवडणूकीत सुद्धा केंद्रात भाजपची सत्ता येणार आणि नरेंद्र मोदी पुन्हा रेकॉर्ड ब्रेक पंतप्रधान होणार असा विश्वास जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांनी सुपर वायॉरिअरच्या बैठकीत बोलताना व्यक्त केला. बैठकीनंतर गोलाई चौकात तीन राज्यात सत्ता आल्याचा जल्लोष साजरा केला .

रविवार दि. 3 डिसेंबर 2023 रोजी भारतीय जनता पार्टीच्या भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातील सर्व  सुपर वॉरिअरची बैठक जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश निमंत्रित सदस्य तथा भूम परंडा वाशी विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर, विधानसभा विस्तारक शिवाजी गिट्टे पाटील, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी,  जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, महादेव आखाडे,  गुलचंद व्यवहारे, संतोष सुरवसे, इंग्रजीत देवकते  प्रदीप शिंदे, भूम तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, वाशी तालुका अध्यक्ष राजगुरू कुकडे महाराज,परंडा तालुका अध्यक्ष विधिज्ञ गणेश खरसडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे धाराशिव जिल्ह्याला येणार असल्यामुळे या बैठकीत जिल्ह्यातील सुपर वॉरिअरची विशेष बैठकित आणि मार्गदर्शन होणार असल्यामुळे प्रत्येक विभाग विधानस सभा मतदार संघात सुपर वॉरिअरची बैठक घेण्यात येत आहे. त्याप्रमाणे भूम येथे ही बैठक घेण्यात आली. प्रत्येकाला आपापली जबाबदारी बूथ क्रमांक, बुथ अध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख  यांच्या संदर्भात माहितीची जाणीव करून दिली. या बैठकीनंतर सर्वांनीच भूम शहराच्या गोलाई चौकामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टीची एका हाती सत्ता आल्याच्या निमित्ताने फटाके वाजवून, पेढे तुला करत घोषणांची आत शिवाजी करत आनंदोत्सव साजरा केला.या सर्व कार्यक्रमासाठी भूम तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, उपाध्यक्ष बाबासाहेब वीर, शहर अध्यक्ष शंकर खामकर, सरचिटणीस हेमंत देशमुख, कामगार मोर्चा विधानसभा प्रमुख सचिन बारगजे, मुकूंद वाघमारे, सुधीर घोलप,  प्रदीप साठे, शांतीलाल बोराडे,  वाघमारे, सचिन आदींनी परिश्रम घेतले.



 
Top