धाराशिव (प्रतिनिधी)-आकांक्षित असलेल्या धाराशिव जिल्ह्यात महामार्ग व रेल्वेसाठी सध्या सक्तीने भूसंपादन केले जात आहे. याएवेजी थेट खरेदीने भूसंपादन केल्यास आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पाचपट मोबदला मिळून न्याय मिळेल यात केंद्र सरकारने लक्ष घालावे अशी मागणी खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी संसदेत केली.

आकांक्षित म्हणून गणल्या गेलेल्या धाराशिव जिल्ह्यातून तसेच सोलापूर जिल्ह्यातून सुरत-चेन्नई महामार्ग वजात आहे. या दोन्ही जिल्ह्यातून सोलापूर-तुळजापूर-धाराशिव हा रेल्वे मार्गही तयार होत आहे. या दोन्ही प्रकल्पांसाइी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया सध्या सुरू असून, ती सक्तीच्या पध्दतीने केली जात आहे. दोन्ही प्रकल्प केंद्र शासनाचे असून शेतकऱ्यांना त्यांच्या संपादित केलेल्या जमीनीचा मावेजा जमीन भुसंपादन कायदा 2013 च्या तरतुदीनुसार रेडी रेकनर (बाजार मुल्य) दरानुसार न देता शेतकऱ्यांकडून थेट खरेदीचे प्रस्ताव आहे. असे असतानाही सोलापूर, धाराशिव जिल्ह्यात मात्र सक्तीने भूसंपादन केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोबदला कमी मिळणार आहे. थेट खरेदीने केल्यास पाचपट मोबदला मिळू शकतो. या माध्यमातून आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना न्याय मिळेल. तेव्हा केंद्र सरकारने यात लक्ष घालून दोन्ही प्रकल्पांसाठी होत असलेले भूसंपादन थेट खरेदीने करण्याबाबत निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही खासदार राजेनिंबाळकर यांनी लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनातून केली आहे.


 
Top