धाराशिव (प्रतिनिधी) - येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाच्या अनुसूचित जाती -अनुसूचित जमातीच्या सल्लागार समितीवर प्राचार्य प्रवर्गातून विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ.प्रमोद येवले यांनी नुकतीच निवड केली आहे.
यापूर्वी देखील विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यशस्वीपणे काम केले आहे. प्राचार्य डॉ.देशमुख यांनी विद्यापीठाच्या अनेक महत्त्वपूर्ण समितीवर कार्य करून आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. सध्या महाराष्ट्र शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाचे देखील ते प्राचार्य प्रवर्तक व विविध सहकारी बँकांचे ते सल्लागार म्हणून देखील काम पाहत आहेत. या निवडीबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्य शुभांगी गावडे ,मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.या निवडीबद्दल प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
