धाराशिव (प्रतिनिधी)-आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित के.टी पाटील संगणकशास्त्र महाविद्यालयात व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विषयी आपले विचार व्यक्त करताना प्राचार्य डॉ. अजित मसलेकर सर म्हणाले की“ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरिबांची स्थिती सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. समाजातील अस्पृश्यतेसह अनेक प्रथा नष्ट करण्यात त्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. बौद्ध धर्माचे अनुयायी मानतात की त्यांचे बुद्ध गुरु देखील डॉ. आंबेडकरांसारखे सद्गुरु होते. बौद्ध अनुयायांच्या मते डॉ.आंबेडकरांनाही त्यांच्या कार्यातून निर्वाण मिळाले आहे. म्हणूनच त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते.
बाबासाहेबांनी अनेक वर्षे बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंतिम संस्कारही बौद्ध धर्माच्या नियमांनुसार करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रा.शुभम पाटील, प्रा. गवळी मॅडम, प्रा. पटेल मॅडम, सुदर्शन कुलकर्णी , श्री अजय शिराळ, श्री राजाभाऊ जाधव, सय्यद, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.