उमरगा (प्रतिनिधी)- मराठा आरक्षण योध्दे मनोज जरांगे पाटील हे 10 डिंसेबर रोजी कवठा येथे विशेष भेट देणार आहेत. जरांगे पाटील यांच्या स्वागताची कवठा ग्रामस्थांच्यावतीने गेल्या आठ दिवसा पासून जय्यत तयारी केली आहे. कवठा गावातील विठृल रुक्मीणी महिला भजनी मंडळाच्या वतीने जरांगे पाटील यांचे टाळमृदंगाच्या व विठू नामाच्या गजरात महिला हरीनामाच्या जयघोषात स्वागत करणार आहेत. कवठा गावात स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे.
मराठा आरक्षण योध्दे मनोज जरांगे पाटील यांच्या 10 डिंसेबर रोजी औसा, किल्लारी, उमरगा या विविध ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. विनायकराव पाटील यांनी सलग सात दिवस अमरण उपोषण करून जीवंत समाधि घेण्याचा निर्धार केला होता. जरांगे पाटील यांच्या विनंती वरून विनायकराव पाटील यांनी समाधी अंदोलन मागे घेतले होते. तेव्हा पासून अंतरवली सराटी आणि कवठा सर्वत्र मराठा आरक्षणाची केंद्रबिंदू मानण्यात येत आहेत. जरांगे पाटील यांच्या मराठवाडा दौऱ्यात कवठा गावाला विशेष भेट देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून कवठा गावातील ग्रामस्थांच्या वतीने जरांगे पाटील यांच्या विशेष भेटीच्या स्वागतची जय्यत तयारी सुरु आहे. येथील मंगल कार्यालयाच्या मैदानाच्या साफसफाईला सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने जेसीबीचे पूजन करून रविवारी प्रारंभ करण्यात आला आहे. मराठा समाज बांधवांची या विशेष भेटी दरम्यान उपस्थिती रहाणार आहे. या विशेष भेटीत जरांगे पाटील मराठा समाज बांधवांशी थेट संवाद साधणार आहेत.कवठा येथील विठृल रुक्मीणी महिला भजनी मंडळाच्या वतीने जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.
“ मोजता येत नाही मापान
एवढं मैदान भरलंय लोकान
गाडी नाही बंगला नाही
नाही मोटार ..... जरांगे दादा नाहीत कुणाचे लाचार .....
जरांगे भाऊ आले कवठ्याला ...
कवठा गावाची पुण्याई मोठी ....
मराठा आरक्षणासाठी लाखो मराठ्यांची झाली दाटी ....
या सह आदि मराठा आरक्षण गीतांच्या माध्यमातून महिलां भगीनींच्या वतीने जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. विनायकराव पाटील यांच्या सह समस्त ग्रामस्थांच्या वतीने जरांगे पाटील यांच्या स्वागता वेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडून येणार आहे. अलका माने, शोभा सोनवणे, सुनंदा माने, अलका कोराळे, तेजाबाई पवार, संजना सोनवणे, मंगल माने, रंजना पवार, शंकुतला माने, जलसाबाई सोनवणे, प्रभावती सोळंक, सतीश पवार, राजेंद्र सोनवणे, तानाजी सोनवणे, शरदश्चंद्र पवार, विश्वनाथ साळुंके आदि सह भजनी मंडळी जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारीत आहेत.
जरांगे - पाटील हे येथे दुपारी तीन वाजता कवठा गावाला विशेष भेट देणार आहेत . त्यांच्या भेटी नंतर लागलीच उमरगा येथे होणाऱ्या विराट सभेसाठी ते रवाना होतील. कवठा येथील सत्कार समारंभ व विशेष भेट या कार्यक्रमाला आलेले परिसरातील सर्व मराठा समाज बांधवांनी उमरगा येथे सायंकाळी होणाऱ्या विराट जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन विनायकराव पाटील यांनी केले आहे. व्यकंटराव सोनवणे, विकास पाटील, मलंग गुरुजी, नानाराव भोसले, नितीन पाटील, भरत पाटील, अतुल सोनवणे, भीमा सोनवणे सह कवठा सकल मराठा युवक जरांगे पाटील यांच्या स्वागता साठी विशेष परिश्रम घेत आहेत.