धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील रुईभर येथील जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने जिल्हास्तरीय नमो खुल्या कबड्डी स्पर्धांचा उद्घाटन समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील तरुणांना खेळाचे महत्व समजावे म्हणून संपूर्ण भारतात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध खेळांचे आयोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नमो खुल्या कबड्डी स्पर्धाचे विद्यालयात शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे यांच्या अध्यक्षतेखाली व उद्घाटक ॲड मिलिंद पाटील (महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलन तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा ) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड संतोष सूर्यवंशी (जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा), नितीन काळे, राजसिंह निंबाळकर, राहुल काकडे, सुजित साळुंके उपस्थित होते. या स्पर्धेत 20 संघाची नोंदणी झालेली आहे.
कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी सुभाष दादा कोळगे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले कि या स्पर्धा शांततेच्या मार्गाने पार पाडण्याचे आवाहन करून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे उद्घाटक ॲड मिलिंद पाटील यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संतोष सूर्यवंशी मार्गदर्शन करताना म्हणाले की जीवनात खेळाचे महत्व आहे खेळामुळे प्रतिकार शक्ति वाढते . खेळाचे महत्व समजून घेण्याचे आवाहन केले.
भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सचिव रामदास कोळगे यांनी प्रास्ताविक भाषण केले.याप्रसंगी प्रा.जयप्रकाश कोळगे राजनारायण कोळगे , रुईभरचे माजी सरपंच बालाजी कोळगे, नानासाहेब कदम (तालुकाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा धाराशिव), नितीन इंगळे (सरपंच बेंबळी), मोहन खापरे (माजी सरपंच), संतोष आगलावे, राजाभाऊ रसाळ, भीमराव कोळगे (माजी सैनिक), शिवाजीबारगुळे गुरूजी, शिवाजी पवार गुरुजी, पोपट नलावडे गुरुजी, आगतराव भोईटे (माजी मुअ), पांडुरंग कोळगे (चेअरमन), प्रकाश भणगे (व्हाईस चेअरमन), गोपाळ निंबाळकर (संचालक), बाळासाहेब कोळगे (संचालक), पोपट पाडुळे, मधुकर निंबाळकर, शशिकांत कोळगे, गोपीनाथ कोळगे, शिवाजी काकडे, महादेव शिंपले, अमर भोईटे श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, जयप्रकाश विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. शिवकन्या साळुंके ,इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री नानासाहेब शेलार,पर्यवेक्षक के. ए. डोंगरे, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, खेळाडू, विद्यार्थी उपास्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कांबळे यांनी तर आभार नानासाहेब पवार यांनी मानले .
