धाराशिव (प्रतिनिधी)- त्रैलोक्याचे स्वामी प.पू. श्री गुरूदेव दत्तात्रेय महाराज यांच्या जन्मोत्सनिमित्त पिताश्री श्रीमंतराव (आबा) रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने धाराशिव येथे आयोजित गुरूचरित्र पारायण, ग्रंथदिंडी, भजन, कीर्तन, अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास मंगळवारी (द़ि19) प्रारंभ होणार आह़े
धाराशिव शहरातील श्री सदगुरू कॉलनी, भानूनगर येथे पिताश्री श्रीमंतराव (आबा) रणदिवे प्रतिष्ठाणच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री गुरूदेव दत्तात्रेय महाराज यांच्या जन्मोत्सवनिमित्त 19 ते 26 डिसेंबर या कालावधीत गुरूचरित्र पारायण, अखंड दत्तनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन केले आह़े सप्ताहचे यंदा 9 वे वर्षे आहे. मंगळवार, दि. 19 डिसेंबर रोजी स. 10 वा. श्री तुळजाभवानी देविजींचे महंत प.पू. तुकोजी बाबा (तुळजापूर) व रुईभर येथील श्री दत्त संस्थानचे संस्थापक अप्पाबाबा महाराज (रुईभर) यांच्या हस्ते देव-देवतांच्या पूजन विधीने सप्ताह सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. याच दिवशी दु. 1 वा. मुक्ताई महिला भजनी मंडळाची (महात्मा गांधीनगर) भजनसेवा होणार आह़े सप्ताह कालावधीत विविध ठिकाणच्या महिला भनजी मंडळाची भजन सेवा होणार आह़े सोमवारी (द़ि25) सायं. 6 वा. शिवकुमार मोहेकर यांचा भजनसंध्या कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि. 26 रोजी स. 10 वा. रामायणाचार्य, हभप भारत कोकाटे महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. तत्पूर्वी स. 8 वा. गुरूचरित्र ग्रंथदिंडी तर दु. 12 वा. श्री दत्त जन्मोत्सव सोहळा होणार आहे. यानंतर महाप्रसाद वाटपाने या सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे. या सप्ताह सोहळ्याचा भाविक -भक्त, नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पिताश्री श्रीमंतराव (आबा) रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी केले आहे.

