भूम (प्रतिनिधी)- शहारासह तालुक्यातील सकल मराठा समाज यांच्या वतीने पुन्हा साखळी उपोषण सुरू केले असून याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी मराठा समाजाच्या वतीने बोलत असताना सदरील प्रतिनिधी यांनी असे सांगितले की . जरांगे पाटील यांच्या वतीने आदेश दिल्याने हे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. जरांगे पाटील यांनी आदेश दिल्यापासून मागील काळात देखील दोन टप्प्यात साखळी उपोषण केले होते. हा टप्पा उपोषणाचा तिसरा असून आज शहरात याची सुरुवात करण्यात आली आहे. याचे लोन काही दिवसात तालुक्यात देखील पसरून तालुक्यातील प्रत्येक गावात साखळी उपोषण काही दिवसात सुरू होईल. जरांगे पाटील यांनी 24 तारखेपर्यंत साखळी उपोषण शांततेत सुरू ठेवण्याचे आव्हान केले आहे. याप्रमाणे सदरील उपोषण देखील शांततेत सुरू राहील 24 डिसेंबर नंतर पुढील आदेश येताच त्या प्रमाणे उपोषणाची दिशा असेल. 17 डिसेंबर रोजी अंतरवली सराटी येथे पाटील यांनी मराठा समाजाची बैठक बोलावली आहे. यावेळी सकल मराठा समाज बांधव यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय, पोलिस प्रशासन व तहसील कार्यालय येथे जाऊन साखळी उपोषण सुरू करण्यात आल्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.



 
Top