भूम (प्रतिनिधी)-भूम शहरात नगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक शौचालो उभारण्यात आली असून, याची देखभाल- दुरुस्ती व स्वच्छता प्रत्येक महिन्याला भूम नगरपालिकेच्या वतीने करण्यात येते. यामुळे उघड्यावर लघुशंका, थुंकणे व धूम्रपान करणाऱ्यांना यापुढे पालिकेच्या वतीने 500 रुपये दंड आकारण्यात येईल, असे सांगण्यात आले. यासोबतच दैनंदिन कचरा रस्त्यावर टाकला तरीदेखील हा दंड लावण्यात येणार आहे.उघड्यावर हे कराल तर दंड
लघुशंका शहरातील शौचालयात लघुशंका न करता उघड्यावर लघुशंका केल्यास 500 दंड पालिका आकारणार आहे. पालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागात शौचालय उभे करण्यात आले आहे. यामुळे उघड्यावर शौचास बसल्यास 500 दंड भरावा लागणार आहे. थुंकणे शहरात सार्वजनिक ठिकाणी थुकण्यावरदेखील निबंध आहेत. कुणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळून आल्यास नगरपालिका त्याच्याकडून पाचशे रुपये दंड वसूल करणार आहे.
धूम्रपान शहरातील सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी धूम्रपान केल्यास पालिका सदरील नागरिकास 500 रुपये दंड लावणार आहे.11 महिन्यांत एकही कारवाई नाही. सार्वजनिक ठिकाणी, धूम्रपान, शौच, लघुशंका व थुंकणे यास प्रशासनाच्या वतीने 500 रुपये दंड जाहीर केला आहे. परंतु, कारवाईकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. त्यामुळे मागील 11 महिन्यांत नियमाचे उल्लंघन करणाऱ्या एकाही नागरिकाला दंड लावण्यात आला नसल्याने दिसून येत आहे.शहरात उभारली 14 सार्वजनिक शौचालये नगर परिषदेच्या वतीने शहरात आजघडीला 14 शौचालये उभारण्यात आली आहेत. याची स्वच्छता करण्यासाठी महिन्याला बजेटदेखील उपलब्ध आहे. परंतु, काही ठिकाणी पाण्याची कमतरता भासत असल्याने योग्यरीत्या स्वच्छता होत नसल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर निघत आहे.शहरात यापुढे उघड्यावर लघुशंका, थुंकणे व कचरा टाकणाऱ्या नागरिकास पालिकेच्या वतीने 500 दंड आकारण्यात येणार आहे. असे भूम नगरपालिकेचे स्वच्छता विभागप्रमुख प्रदीप निकाळजे, यांनी सांगितले आहे.