धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कळंब तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कळंब तालुकाध्यक्ष व कळंब शहराध्यक्ष या पदाच्या निवडीसाठी दि.15 डिसेंबर रोजी कळंब येथे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी कळंब तालुका व शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये कळंब विद्यार्थी तालुका अध्यक्ष व कळंब विद्यार्थी शहराध्यक्ष यांच्या निवडीसाठी ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये इच्छुक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मुलाखती दिल्या.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुका निहाय आढावा बैठका घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे व विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका निहाय आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या आढावा बैठकीमध्ये तालुक्यातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्याबद्दल विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने यांनी त्यांचे स्वागत केले. या बैठकीसाठी भैय्यासाहेब खंडागळे, दत्ताजी तनपुरे, अजित घुले, नितीन ठाणंभिर, इमरान खान, बप्पासाहेब जावळे पाटील, अभिजीत हाऊसलमल, अतुलमाने, नितीन हारकर, कुंदन टोपे, हर्षवर्धन पाटील, यश खंडागळे आदी पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.


 
Top