धाराशिव (प्रतिनिधी)-ढोकी पोलीस ठाणे :आरोपी मनिषा दिगंबर फेरे, वय, 36 वर्षे, (सरपंच),  रा. तावरजखेडा,ता. जि. धाराशिव, विजय नारायण चित्ते, वय 52 वर्षे, व्यावसा-(ग्रामसेवक), रा. पंचायत समिती कार्यालय धाराशिव, ता. जि. धाराशिव, तुकाराम नानासाहेब फेरे, वय 48 वर्षे, (उपसरपंच), रा. तावरजखेडा ता. जि. धाराशिव यांनी दि.18.08.2022 रोजी पासून ते दि. 16.01.2023 रोजी पर्यंत वेळोवेळी तावरजखेडा ता. जि. धाराशिव  गावाला पाणीपुरवठा व इतर सोयी देण्यासाठी आराखडा तयार करुन त्यामध्ये दोन विंधन खोदाई विहीर, पाण्याचे पाईप, लोखंडी पाईप, बोरमध्ये मोटारी, घेतल्या असल्याचे दर्शवून शासकीय रक्कम 8 लाख 84 हजार 550 रूपये उचलून काम केल्याचे दर्शवून कागदोपत्री रेकॉर्ड तयार करुन स्वत:चे फायद्यासाठी सदर रक्कम उचलून शासकीय रक्कमेचा अपहार करुन शासनाची फसवणुक केली. असा मा. कोर्टाने कलम 156(3) सी. आर. पी. सी प्रमाणे आदेश केल्यावरुन फिर्यादी समाधान केशव फेरे, वय 32 वर्षे, रा. तावरजखेडा ता. जि. धाराशिव यांनी दि.18.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 166, 406, 409, 420, 467, 468, 471, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 
Top