धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील भागिरथी कॉलनीतील सरकार निवास येथे भारतीय गायन क्षेत्रातील प्रख्यात गायक स्व महम्मद रफी 24 डिसेंबर रोजी 100 वी जयंतीनिमित्त कलाविष्कार अकादमी द्वारा हौशी छंदी गायक मेलडी स्टारच्या वतीने त्यांच्या बहारदार गीतांच्या गायनातून जयंती साजरी करण्यात आली प्रथम प्रतिमा पुजन मेलडी स्टारचे मुख्य प्रवर्तक युवराज नळे समन्वयक रवींद्र कुलकर्णी , शेषनाथ वाघ, शरद वडगावकर,तौफीक शेख , यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. अश्या महान गायकाची जयंती साजरी करण्याचे भाग्य आपल्याला लाभले असे मनोगत युवराज नळे यांनी व्यक्त केले. त्यानंतर विधिज्ञ दीपक पाटील, पद्माकर कुलकर्णी, राजाभाऊ कारंडे, सुशील कुलकर्णी, मुनीर शेख, शकील सिद्दीकी, वर्षा नळे, शशीकांत सुर्यवंशी, निशा सुर्यवंशी,श्रेया गायकवाड, नंदिनी गाडे, नितीन बनसोडे, युवराजनळे , रवींद्र कुलकर्णी, शरद वडगावकर, शेषनाथ वाघ, पाटील, यांनी गायन केले प्रा. संजय मिश्रा, राजकुमार उपस्थित होते. मैफील यशस्वीतेसाठी विक्रांत नळे यांनी परिश्रम घेतले.


 
Top