तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदीर महाद्वार समोर असणाऱ्या आर्य चौकात वाहतुक कोंडी नित्याचीच बनले असल्याने येथे वाहतुक कोंडी होवु नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
आर्य चौक हा शहरातील मध्यवर्ती व सर्वाधीक वर्दळीचा चौक आहे. आधीच हा चौक परिसर छोटा आहे. त्यात अतिक्रमणे, खाजगी वाहनांची व रिक्षावाले यांच्या ये-जा मुळे रोजच रोड ब्लॉक होत आहे. वाहतुक कोंडीतुन बाहेर पडणे येथे कठीण बनले आहे. यामुळे पायी चालणाऱ्या भाविक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सदरील भागाकडे प्रशासन पुर्ण दुर्लक्ष करीत असल्याने येथे कायम वाहतूक कोंडी असते. याचा ञास भाविक नागरिकांना होत आहे.