तुळजापूर (प्रतिनिधी)- संसदेतून 141 खासदाराना घटनाबाहय पद्धतीने निलंबित केल्याने देशातील लोकशाही संपुष्टात येत असल्याने ती वाचविण्यासाठी लक्ष घालुन सरकारवर योग्यती कायदेशीर कारवाई राष्ट्रपतींनी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, देशाच्या संसदेमध्ये सनदशीर मार्गाने प्रश्न विचारल्याने राज्यसभा व लोकसभेतील एकुण 141 खासदारांना निलंबित केलेले आहे. संसदेच्या इतिसाहातील सर्वात दुर्दैवी घटना आहे. महोदया, आपल्या देशात लोकशाही आहे. परंतु देशात पावलोपावली या सरकारकडून लोकशाहीचा खून केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना दिली त्या घटनेच्या विरुद्ध सर्व काम चालू
आहे. या सरकारकडून वारंवार घटनेची पायमल्ली होत आहे. घटना पायदळी तुडवली जात आहे. देशामध्ये सगळीकडे हुकुमशाही पद्धतीने कारभार केला जात आहे. तरी राष्ट्रपती महोदया या देशाची घटना व लोकशाही वाचवण्यासाठी आपण स्वतः लक्ष देऊन या सरकारवर योग्य ती कारवाई करावी. अन्यथा
आम्हाला या शासनाच्या विरुद्ध लोकशाही वाचवण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल. असा इशारा निवेदनात दिला आह. हे निवेदन तालुकाध्यक्ष धर्यशिल पाटील, गणेश नन्नवरे, संदीप गंगणे, तौफीक शेख, शहाजी नन्नवरे, शहाजी कसबे, शक्ती पांडागले, सागर सिरसट,गणेश नन्नवरे, इब्राहीम इनामदार, धनंजय पाटील, शरद जगदाळे, अक्षय कदम यांनी दिले.