धाराशिव (प्रतिनिधी)-30 व 31 डिसेंबर 2023 रोजी अहमदिया मुस्लिम जमाअतची युवा शाखा मजलिस ख़ुद्दाम-उल-अहमदिया धाराशिवच्या ख़िदमते ख़ल्ख़ विभाग (मानव सेवा) तर्फे शहरातील गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.

दर महिन्यात मानव सेवा विभागा अंतर्गत मजलिस ख़ुद्दाम-उल-अहमदिया वेगवेगळ्या जनकल्याण कार्य- कपडे वाटप, हिवाळ्यात ब्लँकेट वाटपअन्न वाटप, उन्हाळ्यात पाणी वाटप,रक्तदान शिबिरे, रूग्णालयातील रूग्णांना फळे वाटप, प्रथमोपचार शिबिरांचे आयोजन व युवकांना प्रशिक्षण देणे, विविध रोगांपासून बचाव करण्याबाबत चर्चासत्रे आयोजित करणे इ. करत आहे .

अहमदिया मुस्लिम जमाअतचे संस्थापक हज़रत मिर्झा ग़ुलाम अहमद क़ादियानी (ईश्वर त्यांना शांती देवो) यांनी मानव सेवा बद्दल एका ़फारसी (परशियन) श्लोका मध्ये असे सांगितले आहे. मानवतेची सेवा हाच माझा उद्देश,ध्येय आणि हेतू आहे.हेच माझे कर्तव्य, माझे कार्य, माझी पद्धत आणि माझी जीवनशैली आहे. या कार्यक्रमात ख़ुद्दाम-उल-अहमदिया शहर अध्यक्ष  राग़ेब अलीम, उपाध्यक्ष अहमदिया मुस्लिम जमाअत अब्दुस समद, चिटणीस मानव सेवा अब्दुल क़य्युम नासीर, मक़बूल अहमद प्रचारक अहमदिया मुस्लिम जमाअत, तसेच अब्दुल अलीम,नदीम अहमद, मुताहिर अहमद, सजील अहमद, आदिल अहमद, तौसीफ अहमद, शफीक अहमद, माज़ीन अहमद, मंज़ूम अहमद व इतर अन्सार सदस्य यांचा समावेश होता.


 
Top