धाराशिव (प्रतिनिधी)- दि. 6 ते 8 जानेवारी दरम्यान जिल्ह्यातील विदयार्थ्यांना तब्बल 200ते 250 विज्ञानातील प्रयोग स्वतः करुन या विषयाचे ज्ञान  प्रात्यक्षिकाद्वारे प्राप्त करण्याची संधी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा प्रेमी पालकमंडळाकडून धाराशिव येथील विदयार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. या कार्यशाळेच्या आयोजकांनी जालना येथील प्रख्यात टिकरिया सरांच्या टीमला  धाराशिव शहरात दि. 6 ते 8 जानेवारी दरम्यान पाचारण केले असून भविष्यातील नीट किंवा जेईई सारख्या परीक्षेला आपल्या पाल्यांना सामोरे जाण्यासाठी व अशा परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी आपल्या पाल्याचा प्रवेश दि.2 जानेवारीपर्यंत निश्चित करून घेण्याचे आवाहन आयोजकडून बंसल क्लासेस, दंडनाईक कॉम्प्लेक्स , जिजाऊ चौक, बार्शी नाका धाराशिव येथे नोंद करावी, असे आवाहन आयोजक हुकिरे यांनी केले.


 
Top