भूम (प्रतिनिधी)-तालुक्यातील काही गावांमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शौचालय व लाईट व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. ही गोष्ट स्वराज्य पक्षाच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळामध्ये विज पुरवठा सुरळीत करून शौचालय आणि स्वच्छता उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी स्वराज्य पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.
तालुक्यातील सर्व शाळांमध्ये विज पुरवठा सुरळीत करून ज्या ठिकाणी शौचालय नाहीत तेथे शौचालय तात्काळ बांधवेत. ज्या ठिकाणी आहेत तेथील स्वच्छता ठेवावी अन्यथा स्वराज्य पक्ष आक्रमक आंदोलन करेल असा इशारा स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनद्वारे दिला आहे. यावेळी स्वराज्य राज्य कार्यकारणी सदस्य विलास पवार, स्वराज्य जिल्हा सरचिटणीस निलेश वीर, स्वराज्य निमंत्रण हभप गणेश अंधारे, तालुकाध्यक्ष स्वराज्य गणेश नलवडे, तालुका उपाध्यक्ष अरविंद हिवरे, युवक तालुकाध्यक्ष अभिजीत कराळे, स्वराज्य शाखाप्रमुख प्रवीण बोराडे, समाधान बोराडे, प्रवीण मस्के, स्वराज्य शाखाप्रमुख वैजनाथ अंधारे, गणेश अंधारे उपस्थित होते.