तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग एनसीसी विभाग तसेच जिल्हा उप रुग्णालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यामाने एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीचे उद्घाटन डॉ. श्रीनिवास जाधव वैद्यकीय अधीक्षक तुळजापूर यांच्या हस्ते संपन्न झाले तर डॉ. प्रणिता गडेकर यांनी यावेळी एड्स जागृती विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ.अविनाश ढगे, श्रीमती रूपाली चौधरी, श्रीमती अश्विनी देशमुख, डॉ. सीमा मोहिते तसेच कार्यक्रमाधिकारी प्रा. व्ही. एच. चव्हाण, प्रा. अनिल नवत्रे, डॉ.ए .बी .गायकवाड यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.