भूम (प्रतिनिधी)- कुटुंबात कलेचा कसलाही वारसा नसताना पाथरूड तालुका भूम येथील स्नेहा माधव दुधाळ हिने लावणी कला क्षेत्रात राष्ट्रीय - अंतर राष्ट्रीय स्तरावर व्दितीय क्रमांक मिळवला आहे. तिचे सर्वत्र भरभरून कौतुक केले जात आहे.
अधिक माहिती की, भूम तालुक्यातील पाथरूड येथील स्नेहा माधव दुधाळ ही बीड येथील एका महाविद्यालयामध्ये इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. स्नेहा दुधाळच्या कुटुंबात कसलाही कलेचा लवलेश नाही, परंतु स्नेहाला मात्र लावणी कलेची आवड निर्माण झाली.
पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील ओपन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. एवढ्यावरच ती थांबली नाही. तब्बल विविध 13 देशातील लावणी कला क्षेत्रातील कलाकारांची आंतरराष्ट्रीय स्तरावर सिमला येथे स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत देखील तिने प्रथम क्रमांक मिळवला. स्नेहा दुधाळ हिचा सत्कार करताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य बाळासाहेब क्षिरसागर, भूम तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब वीर, शंकर खामकर, हेमंत देशमुख, मुकुंद वाघमारे, प्रदीप साठे, विधीज्ञ संजय शाळू, ज्येष्ठ नेते चंद्रकांत गवळी, शांतीलाल बोराडे, लक्ष्मण बोराडे, सचिन बारगजे आदींची उपस्थिती होती.