धाराशिव (प्रतिनिधी)-  राष्ट्रीय गणित दिनानिमित्त श्रीपतराव भोसले स्कूल धाराशिव येथे इयत्ता 8वी विभागाच्या वतीने “गणित सूत्रावली स्पर्धा“,“दोस्ती गणिताशी “ तसेच “ भूमितीय आकृती स्पर्धा “घेण्यात आल्या,या विविध स्पर्धा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचालक तथा प्रशासकीय अधिकारी आदित्य  पाटील, उप मुख्याध्यापक  एस बी. कोळी पर्यवेक्षक वाय.के. इंगळे 7 वी पर्यवेक्षक एन.एन. गोरे गणित विभाग प्रमुख डी.जे. वीर यांच्या हस्ते सत्कारित करण्यात आले.             

विद्यार्थ्यांनी शिक्षकांना प्रश्न विचारून भांडावून सोडले पाहिजे  आदित्य सुधीर पाटील असे मत मांडले विद्यार्थी नेहमी शिक्षकांना प्रश्न विचारतील अशी आशा व्यक्त केली, प्रास्ताविक गणित विभाग प्रमुख डी.जे. वीर यांनी केले. मनोगत एन.डी.पाटील यांनी व्यक्त केले. श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग के.जी. निकम यांनी सांगितले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जे.बोबडे यांनी केले. अध्यक्षीय समारोप  एस.बी. कोळी यांनी केला. याप्रसंगी ज्येष्ठ गणित अध्यापक एन.डी.पाटील, के.व्ही. सोनवणे, डी.व्ही. इनामदार, एच.टी. कोतले, के.आर. शिंदे, एस.एम. देशमुख, श्रीमती एस.व्ही. देशमुख  यांच्यासह इयत्ता आठवीच्या सर्व अध्यापकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.


 
Top