वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील धाटपिंप्री येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. 21 डिसेंबर रोजी न्यू हायस्कूल येथे पार पडले. प्रदर्शनाचे उद्घाटन वाशी पं. स. चे गटविकास अधिकारी संतोष नलावडे  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी भारत बन, मुख्याध्यापक शिवाजी आवारे, केंद्रप्रमुख मारूती कांबळे, संस्था अध्यक्ष सुखदेव आवारे, विज्ञान शिक्षक देविदास सातपुते, समग्र शिक्षा विशेष शिक्षक आणि विषय तज्ञ काझी मॅडम, व विद्यार्थी उपस्थित होते. 

या प्रदर्शनामध्ये गट क्र. 1 - इयत्ता 6 वी ते 8 वी प्रथम क्रमांक यश समाधान गवळी - जि. प. कें. प्रा.शाळा पारा, द्वितीय क्रमांक चि. ओंट्रिया रोबिन अंकुरम विद्यामंदिर वाशी, तृतीय क्रमांक कु. संचिता सचिन कवडे जि. प. कन्या प्रशाला वाशी. 

गट क्रमांक 2 इयत्ता 9 वी ते 12 वी प्रथम क्रमांक चि. प्रणव प्रशांत देशमुख क. मा. ज. म. वाशी, द्वितीय क्रमांक चि. सार्थक गणेश वारे  ग्रामीण विद्यालय लाखणगाव, तृतीय क्रमांक कु. समृद्धी दिगंबर इंगोले न्यु हायस्कूल घाटपिंपरी. शिक्षकांची शैक्षणिक साहित्य निर्मिती इयत्ता 1 ली ते 8 वी प्रथम क्रमांक श्रीमती सविता श्रीधर महामुनी जि. प. कें. प्रा. शाळा वाशी. इयत्ता 9 वी ते 12 वी.

प्रथम क्रमांक पुनम गौतम चेडे जे. आय. आर. टी. वाशी या विद्यार्थ्यांची व शिक्षकांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.      उद्घाटन प्रसंगी गटविकास अधिकारी संतोष नलावडे,  गटशिक्षणाधिकारी भारत बन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आयुब शेख यांनी केले. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण 59 शाळेतील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी प्रयोग सादर केले. परीक्षक म्हणुन पाटील, क्षिरसागर, राऊत, इंगळे, पायघन यांनी काम पाहिले. यावेळी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना व विजेत्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली आली.


 
Top