भूम (प्रतिनिधी) - धाराशिव भूसंपादन कार्यालयात वर्ग करण्यात आलेले महसुल प्रकरणे आता भूम उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत चालवले जाणार असून, यामुळे शेतकरी यांची सोय झाली आहे. यासाठी भूम येथील वकिल मंडळाने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची दि. 21 डिसेंबर रोजी भेट घेवुन पाठपुरावा केला होता.
तालुक्यातील 80 महसुल प्रकरणे उपजिल्हाधिकारी भुसंपादन मध्यम प्रकल्प 2 या कार्यालयात वर्ग करण्यात आली होती. हे या प्रकरणातील शेतकरी यांना सुनावणीसाठी धाराशीवला जावे लागत होते. यामुळे वेळ व पैसा याचा अपव्यय होत होता. यासाठी वकिल मंडळाच्या अध्यक्षा अमृता गाढवे यांनी व वकिल मंडळाचे शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांची दि 21 डिसेबर रोजी धाराशीव येथे भेट घेवुन हे 80 प्रकरण उपविभागीय अधिकारी भूम यांच्याकडे वर्ग करावेत अशी मागणी केली होती. जिल्हाधिकारी यांनी या मागणीची दखल घेत हे महसुल प्रकरणे भूम उपविभागीय अधिकारी कार्यालयात चालवावीत असा आदेश काढला आहे. त्यामुळे शेतकरी यांची सुनावनी भूम येथे होणार आहे. याबाबत वकिल मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी वकिल मंडळाच्या अध्यक्षा अमृता गाढवे. विधिज्ञ मकरंद सोन्ने, विधीज्ञ आर. आर. सुकाळे, विधीज्ञ एस.एस. खरवडे, विधीज्ञ विवेक मोटे,विधीज्ञ एस. एस. पालकर,विधीज्ञ ए. डी. हिवरे, विधीज्ञ एस. बी. हुंबे, विधीज्ञ बी. बी. मुंढे, विधीज्ञ आर. बी. साळुंके, विधीज्ञ डि. यु. पाटील. विधिज्ञ एस. एस. ढगे आदी उपस्थित होते.