तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 येथील कारभार फक्त दोनच कर्मचारी यांच्यावरच चालतं असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद यांचा पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 असून पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत तेर, पळसप, घोगरेवाडी, कोळेकरवाडी, म्होतरवाडी, भिकार सारोळा, रामवाडी, हिंगळजवाडी, मुळेवाडी, थोडसरवाडी, बुकनवाडी,पानवाडी ही गावे असून  दररोज अंदाजे 20 पशुधन दवाखान्यात उपचारासाठी येतात. पशुवैद्यकीय दवाखाना येथे पाच जागा कार्यरत आहेत.परंतू येथील पशुवैद्यकीय विकास अधिकारी यांची प्रतिनियुक्ती तुळजापूर पंचायत समिती येथे करण्यात आली आहे.तर दोन शिपाई यांची पदें रिक्त आहेत.दवाखान्याचा संपूर्ण कामाचा भार पशुधन पर्यवेक्षक व व्रणोपचारक यांच्यावर पडत आहे.पशुधन विकास अधिकारी यांची प्रतिनियुक्ती रद्द करणे आवश्यक असून शिपाई यांची रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे.


पशुधन विकास अधिकारी यांची प्रतिनियुक्तीवर तर दोन शिपाई यांची पदें रिक्त यामुळे कामाचा प्रचंड ताण पडत आहे.

-बी.एम.कुंभार, पशुधन पर्यवेक्षक, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1,तेर.


मी 10 व 11 डिसेंबर 2023 रोजी तेर येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथे सहा महिन्यांचे बोकड ताप आला म्हणून तपासणीसाठी घेऊन गेलो होतो.बोकडावर व्रणोपचारक देशमुख यांनी उपचार केले परंतु बोकड 11 डिसेंबरला पशुवैद्यकीय दवाखाना येथेच मयत झाले.पशुधन विकास अधिकारी असते तर माझे बोकड वाचले असते.तेर येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 येथील पशुधन विकास अधिकारी यांची प्रतिनियुक्तीवर रद्द करावी व दोन शिपाई यांची रिक्त पदें तातडीने भरण्यात यावीत.

-शहाजी भागवत सौदागर, पशुपालक,तेर.


तेर येथील शहाजी सौदागर हे सहा महिन्यांचे बोकड घेऊन पशुवैद्यकीय दवाखाना येथे उपचारासाठी आले होते.मी पशुधन पर्यवेक्षक बी.एम.कुंभार यांच्या आदेशानुसार मी बोकडाला मेनोलिक्ट इंजेक्शन व सलाईन दिले होते.

-एस.एस.देशमुख, व्रणोपचारक, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1,तेर


 
Top