धाराशिव (प्रतिनिधी)- शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव या संघटनेच्या सन 2023- 24 या वर्षाकरिता पदाधिकारी निवड बैठक स्वयंवर मंगल कार्यालय जिजाऊ चौक धाराशिव येथे पार पडली.आजच्या बैठकीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव शहर कार्यकारिणी व शिवराज्याभिषेक ऑटो रिक्षा कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष उल्हास उंबरे, उपाध्यक्ष मंगेश निंबाळकर, सचिव आकाश भोसले, कार्याध्यक्ष शुभम लोकरे, सहकार्याध्यक्ष प्रभात मुंडे, संघटक सुनील सूर्यवंशी, सह संघटक सागर इरकर, कोषाध्यक्ष, गणेश पाटील, सहकोशाध्यक्ष ऋषिकेश क्षीरसागर, प्रवक्ता रवी वडणे, सहप्रवक्ता अजय फरताडे, प्रसिद्धीप्रमुख, पवन राऊत, सहप्रसिद्धीप्रमुख, आकाश चौधरी, सोशल मीडिया प्रमुख भैरवनाथ रणखांब, सोशल मीडिया ज्योतीराम काळे, कायदेशीर सल्लागार ॲड. आशिष पाटील यांची सर्वानुमते समितीचे अध्यक्ष जयराज खोचरे यांनी निवड केली.
शिवराज्याभिषेक ऑटो रिक्षा समिती कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष राजकुमार ढोबळे, उपाध्यक्ष अजय जाधव, सचिव योगेश आतकरे, कार्याध्यक्ष मनोज जाधव, सहकार्याध्यक्ष विनोद गीट्टे, संघटक विश्वंभर आगळे, सहसंघटक व्यंकटेश पडिले, कोषाध्यक्ष संतोष तनमोर, सहकोषाध्यक्ष अण्णासाहेब एडके, प्रवक्ता विशाल सूर्यवंशी, सहप्रवक्ता प्रभाकर विधाते, प्रसिद्धीप्रमुख रज्जाक शेख, सहप्रसिद्धीप्रमुख किरण खैरे, सोशल मीडिया मिलिंद वीर व सोशल मीडिया ईश्वर पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सर्व नूतन पदाधिकारी यांचे समितीचे अध्यक्ष जयराज खोचरे, उपाध्यक्ष गौरव बागल, सचिव आकाश कोकाटे, कार्याध्यक्ष देवानंद सुरवसे, संघटक हनुमंत यादव, कायदेशीर सल्लागार धैर्यशील सस्ते, समितीचे माजी अध्यक्ष शशिकांत खुने, धर्मराज सूर्यवंशी, गुंडोपंत जोशी, धनंजय साळुंके, दत्ता साळुंके, संजय शिंदे, संजय डोंगरे, सुनील मिसाळ, अच्युत थोरात, रमेश यादव, सतीश मोहिते, ईश्वर काळे यांनी अभिनंदन केले. ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत गुलालाची उधळण करत जिजाऊ चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जल्लोषात नूतन पदाधिकाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली. पदाधिकारी निवड बैठकीचे प्रस्ताविक जयराज खोचरे यांनी केले सूत्रसंचालन सिद्धेश्वर मते यांनी तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष श्री देवानंद सुरवसे यांनी केले. यावेळी समितीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
