धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव येथील सतत उपक्रमशील असणाऱ्या धारासूर मर्दिनी महिला फेडरेशन अंतर्गत, फेडरेशन सदस्या उज्वला कुलकर्णी यांच्या पुढाकाराने अमेरिकेतील बहीण शिल्पा अजय डांगरे आणि अपर्णा प्रशांत पुराणिक, अश्विनी आनंद कुलकर्णी यांच्या निधी सहकार्याने धाराशिव येथील शिवाजी विद्यालय, सांजा रोड शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वेटर वाटप करण्यात आले. 

शिवाजी विद्यालयात अनेक विद्यार्थी एकल पालक असणारे आहेत. तर काही अनाथ विद्यार्थी आहेत. याच उपक्रमातून या मुलासाठी स्वेटर वाटपातून खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न फेडरेशनने केला आहे. यावेळी विद्यार्थ्यांना बिस्किट पुडाचे वाटप करण्यात आले. याच शाळेतील एका अनाथ विद्यार्थीनीचे पालकत्व फेडरेशन कार्यकारिणीने स्वीकारले आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष रेखा ढगे, उपाध्यक्ष नीता कठारे, उज्वला कुलकर्णी, अंजली देशपांडे, उज्वला मसलेकर, श्रीदेवी चिंचोळकर उपस्थित होत्या. स्वेटर घालणाऱ्या विद्यार्थांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत होता. 


 
Top