तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील माळुंब्रा येथे सार्वत्रीक ग्रामपंचायत निवडणूकित  मागावर्गीय महिला सरपंचने सरपंच  पदासाठी स्वतःची बहिणीचे  जात वैधता प्रमाणपत्र हे स्वतःचे असल्याचे भासवुन  सरपंच होवुन शासनाची फसवणुक केली. या प्रकरणी नायब तहसिलदार यांच्या फिर्यादीवरून माळुंब्रा येथील महिला सरपंच सुरेखा नागनाथ सुतार यांच्या विरोधात तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.                         

या बाबतीत अधिक माहीती अशी की, माळुंब्रा सार्वत्रीक ग्रामपंचायत निवडणूक ठिकाणी यातील आरोपी महिलेने ग्रामपंचायत सार्वत्रीक निवडणुकमध्ये झालेल्या सरपंच मागावर्गीय महिला या पदासाठी स्वतःची बहिण लग्ना पुर्वीचे नाव नयना विश्वास (सुतार) क्षिरसागर यांचे जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र हे स्वतःचे असल्याचे भासवुन शासनाची फसवणुक केलेली आहे. तसेच नामनिर्देशन पत्रासोबत महिला सरपंच यांनी लग्नापुर्वीचे नाव नयना विश्वास क्षिरसागर (सुतार) असे होते व  लग्नानंतरचे नाव सुरेखा नागनाथ सुतार असे असुन दोन्ही नावाची एकच व्यक्ती असल्याची प्रतिज्ञापत्र 100/-रु.चे मुद्रांक पेपरवरती नोटरी करुन खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करून ग्रा. पं. निवडणुकीत उमेदवार पदास पात्र असल्याचे भासवुन शासनाची फसवणुक केली. या प्रकरणी श्रीमती शितल शंकरराव माजलगावकर नायब तहसीलदार तहसील कार्यालय तुळजापूर यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात सरपंच सुरेखा नागनाथ सुतार यांच्या विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे हे करीत आहेत.


 
Top