धाराशिव (प्रतिनिधी)-संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त धाराशिव शहरातील संत गाडगेबाबा चौकात प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
आयुष्यभर लोकसेवेचे व्रत अंगीकारत कीर्तन, प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी समाज जागृतीचे पवित्र कार्य केले. मूर्तीपेक्षा माणसातील देव बघावा ही शिकवण समाजाला दिली. अशा संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त हरिदास शिंदे सैनिक समाज पार्टी जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.याप्रसंगी परिट समाजाचे जिल्हाध्यक्ष नेताजी धोंगडे,तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,नाभिक महामंडळाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने,महिला प्रदेश उपाध्यक्ष सुरेखा काशिद,महानंदा करपे धाराशिव महिला जिल्हाध्यक्षा, पृथ्वीराज चिलवंत, खलिल सय्यद, नितीन शेरखाने,पी आर काळे, प्रमोद चव्हाण, नवनाथ राऊत,महेश धोंगडे, राजाभाऊ माळी,संजय वाघमारे, सुरेश काटकर,बाळु राऊत,अनंत वाघमारे, विश्वनाथ काशिद यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
