धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव येथील फिर्यादी सुदाम राजाराम खाडे, वय 51 वर्षे रा. बार्शी नाका, शिक्षक कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे गवळी गल्ली सराफ लाईन येथे एस. आर. खाडे ज्वेलर्स आहे. दुकानातील कामगार विश्वजीत सुरवसे यांनी बुरखा घालून आलेल्या अनोळखी दोन महिलांनी स्टॅच्युला घातलेला सोन्याचा राणी हार डिझाईन आवडला, तो दाखवा असे म्हणाल्या. त्यावेळी कामगराने स्टॅच्युचा हार त्या दोन अनोळखी बुरखाधारी महिलांना दाखवला. तसेच दुसरे कानातले, गळ्यातले डिझाईन दाखवा असे बोलण्यात गुंतवून त्यातील एका महिलेने 2 लाख 25 हजार रूपयांचा 33 ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणी हार चोरून नेला. सुदाम खाडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.