धाराशिव (प्रतिनिधी)-श्री. तुळजापूर मंदीर येथील श्री. तुळजाभवानी देवीच्या सोन्या चांदीच्या दागिन्याचा गैर व्यवहार प्रकरणी पोलीस ठाणे तुळजापूर येथे गुरनं 519/2023 कलम 420,406,409,381,34 अन्वये 6 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सोमनाथ बबुराव माळी, वय 40 वर्षे व्यवसाय- तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव रा. शासकिय निवास्थान, पापनाश रोड, एस. टी. कॉलनी जवळ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे तक्रारीवरुन आरोपी महंत हमरोजी बुवा गुरु चिलोजी बुवा, महंत चिलोजी बुवा गुरु हमरोजी बुवा, महंत वाकाजी बुवा गरु तुकोजी बुवा, महंत बजाजी बुवा गुरु वाकोजी बुवा, अंबादास भोसले-सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक (मयत), दर्जेवारी रजिस्टर नुसार सेवेदारी पंलगे, सोबत अनोळखी इतर सर्व रा. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 01.01.1963 रोजी 00.00 ते दि. 19.12.2023 रोजी 22.00 वा. सु. श्री. तुळजाभवानी मंदिरातील नमुद वर्णनाचे श्री. देवीजींचे मैल्यवान दागीने, अलंकार, वस्तु, सोने, चांदीच्या वस्तु नमुद केलेल्या कालावधीत ज्या व्यक्तींकडे त्यांचा ताबा व जबाबदारी होती. त्यांनी श्री. तुळजाभवानी देवीजींचे मौल्यवान अलंकार व वस्तु, सोने,चांदीच्या, वस्तु,त्यांच्याकडे विश्वासाने ताब्यात दिलेल्या असताना त्यांनी त्या विश्वासाचा भंग करुन सदर वस्तुंचा स्वत:चे फायद्यासाठी अपहार केलेला आहे, त्या चोरुन नेलेल्या आहे व त्यांचा वापर स्वत:ची वस्तु म्हणून करुन श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान व श्री देवीजींचे भाविकांची दिशाभुल करीत सदरची मालमत्ता लुबाडुन फसवणुक केलेली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे आदेशाने विषेश तपास पथक स्थापन करण्यात आले असून, सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथक प्रमुख उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख हे सोबत तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घाडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चास्कर, महिला पोलीस उप निरीक्षक जाधव हे करत आहेत.