धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील 9 डिसेंबर आकाशवाणी केंद्र धाराशिव या रेडिओ स्टेशन केंद्राच्या 27व्या वर्धापनदिनी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळ संघ पुणे संलग्न शाखा धाराशिव जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच आकाशवाणी केंद्राच्या माध्यमिक राष्ट्रीय, राज्यस्तरीय विविध क्षेत्रातील माहिती शासकीय खात्रीशीर बातम्या जुने नवे गीतां नी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी, विविध मान्यवरांची मुलाखती अतिशय सर्वसामान्य सामान्य ज्ञानात भर पडते असे मनोगत जिल्हा कलाध्यापक संघ सचिव तथा संस्कार भारतीचे पदाधिकारी शेषनाथ केशरबाई दगडोबा वाघ यांनी भावना व्यक्त केली. शुभेच्छा देतेप्रसंगी जिल्हाकलाध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब बोराडे, कलाध्यापक गणेश पांचाळ आकाशवाणी केंद्र धाराशिव कार्यक्रम प्रमुख कृष्णा शिंदे, निवेदक दौलत निपाणीकर, संजय पाटोळे आदि सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. प्रथमच नाविण्यपूर्ण 27 व्या वर्धापनदिनी रक्तदान शिबीर घेण्यात आले त्यासाठी सर्वस्तरात कौतुक होत आहे.