धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील तुळजापूर खुर्द येथील चित्रकार दिग्विजय दत्तात्रय कुंभार यांचे प्राथमिक शिक्षण न .प . शाळेत झाले बालपणापासून चित्र कलेची आवड असल्याने वडीलांचा कापड व्यवसाय दुकान असुन दिग्विजयचा चित्रकलेच्या क्षेत्रात आवड ओळखून त्यांनी त्यास प्रेरित करून चित्रकलेचे उच्च शिक्षणासाठी रहेजा आर्ट कॉलेज ,सर. जे.जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे पाठविले दिग्विजयने चिकाटीने शिक्षण घेऊन आपली वेगळी चित्र शैली निर्माण केली.
“पद्म या चित्रमालीकेचे जहागीर आर्ट गॉलरी मुंबई येथे दि. 4 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये चित्र प्रदर्शन होत आहे. हे सर्व चित्रमानवी भावनाशी सांगड घालणाऱ्या कमळ या विषयावरील आसून हे सकारात्मकते प्रतीक आहे सभोवतालची परिस्थिती कशीही आसली तरीही कमळ स्वतः चे पावित्र सकारात्मकता, शुभ्रता टिकवून ठेवते. “ पद्म“ या चित्र मालिकेमध्ये यावर भाष्य करण्याचा प्रयत्न दिवस रात्रीचे बदलते पहर विविध रंग छटा चित्रकारानी यात दर्शवले आहेत. मानवी जगण्यातल्या विविध भाव- भावनामध्ये हे स्वेत कमळ आपली उर्जा ढळू देत नाही. जिवनाशी सांगड घालून जगण्यातील सकारात्मकता आधोरेकित केली आहे . सदर पद्म चित्र मालिका प्रदर्शन कला क्षेत्रात प्रोत्साहित करणारे वडिल स्व. दत्तात्रय कुंभार यांना समर्पित केले आहे.
आतापर्यत व भारत व परदेशी चित्र संकलन आहे. जहागीर आर्ट गॅलरी मध्ये दुसरे प्रदर्शन असून कांही संग्रहालयात डी.डी. कुंभारचे चित्रे लावली गेली आहेत. अश्या मराठवाड्यातील धाराशिव तुळजापूरचा कलावारसाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या गुणी चित्रकांच्या चित्र प्रदर्शनास प्रचंड प्रतिसाद मिळत असून अनेक चित्र -शिल्पकला, प्रशासकीय, कला रसिक,राजकीय, क्षेत्रातील मान्यवर संस्कार भारती राष्ट्रीय अध्यक्ष चित्रकार वासुदेव कामत, मुंबईचे प्रसिद्ध शिल्पकार चंद्रजीत यादव,ललीत कला अकादमी दिल्ली अध्यक्ष डॉ. उत्तम पाचारण, चित्रकार अनिल नाईक, मोग्गलान श्रावस्ती ,राजेश पाटील कलाध्यापक संघ तथा संस्कार भारतीचे शेषनाथ वाघ, भाजपा प्रदेशकार्यकारिणी सदस्य गुलचंद व्यवहारे, उमाकांत मिटकरी, दालन व्यव स्थापक गौरी वाघमारे प्रदर्शनास भेट देऊन शुभेच्छा दिल्या पद्म प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी कलाससिकांनी प्रचंड गर्दी केली आहे.