धाराशिव (प्रतिनिधी) - येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्रा. विकास भोवाळ यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची इंग्रजी विषयातून पीएच.डी प्रदान झाली आहे.

त्यांच्या संशोधनाचा विषय सोशल रियालिजम इन द नॉव्हेल्स ऑफ गुगी वा थीवांगो हा होता, तर त्यांचे मार्गदर्शक प्रा.डॉ. अनार साळुंखे हे होते. या संशोधन कार्यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .जयसिंगराव देशमुख यांची त्यांना प्रेरणा मिळाली. यापूर्वी प्रा. विकास भोवळ यांनी संशोधन पर दहापेक्षा जास्तीचे संशोधन लेख आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशित केलेले आहेत. व त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. यापूर्वी ते नेट त्याचबरोबर पुणे विद्यापीठाकडून घेण्यात आलेली सेट परीक्षा व उस्मानिया विद्यापीठातून घेण्यात आलेली सेट परीक्षा देखील ते यशस्वीरित्या उत्तीर्ण आहेत. 

 यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्य शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, सहसचिव प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ, मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या यशात त्यांचे वडील गोविंदराव भोवाळ, आई सौ.शोभा भोवाळ, त्यांची पत्नी अश्विनी भोवाळ, चिरंजीव विहान यांची मोलाची साथ मिळाली. त्याचबरोबर अनेक मान्यवरांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या त्यांना मार्गदर्शन मिळाले आहे. यशाबद्दल प्रा. विकास भोवाळ यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.


 
Top