धाराशिव (प्रतिनिधी)- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड.मिलिंद पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार राणा जगजीत सिंह पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य,माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बाळासाहेब क्षिरसागर, कैलास शिंदे व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.