तुळजापूर (प्रतिनिधी)-वर्षभर कुंटुंबाचा उदार निर्वाह कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कांद्याने व निर्यात बंदी निर्णयाने शेतकरी देशोधडीला लागल्याच्या प्रतिक्रिया कांद्याचे आगार असणाऱ्या आपसिंगा शिवारातील शेतकऱ्यांमधुन व्यक्त केल्या जात आहे. कांदा निर्यात बंदी निर्णयाचा अहवाल देणाऱ्यांची चौकशी करावी व खरी सत्य परिस्थिती पाहुन केंद्राने निर्णय घेण्याची मागणी कांदा ऊत्पादक शेतकऱ्यां मधुन केली जात आहे. काहींनी काढणी बंद केली आहे. कांदा प्रश्नी आता राज्य सरकारने पुढाकार घेवुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाचवावे अशी मागणी करीत आहेत. अचानक सरकारने निर्यातबंदीचं हत्यार उपसलं आहे. याचा मोठा फटका माञ शेतकऱ्यांना बसला आहे.
कांदा उत्पादक शेतकरी 2010 मध्ये कि 2023 मध्ये समजेना - कांदा ऊत्पादक शेतकरी गोरे
2010 ला कांद्याला 10रुपये भाव2023ला ही म्हणजे सध्या ही 10रुपये भाव मग आपण 2010मध्ये का 2023मध्ये म्हणजे पुढे जातो आहोत कि आहे तिथेच आहोत हेच कळणासे झाले आहे. कांदा लावू नका असे म्हणून सांगा अशी संतप्त प्रतिक्रिया आपसिंगा येथील शेतकरी श्रीकृष्ण गोरे यांनी व्यक्त केली आहे.
शेती उत्पादनावर वस्तुस्थिती पाहुन निर्णय घ्या -शितल गोरे
निर्यात बंदी धोरण हे शेतकऱ्यांच्या मुळावरचे धोरण बनले आहे शेतकऱ्यांच्या उत्पादन बाबतीत मनमानी धोरण थांबवावे व शेती विषयी शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज करणारे मोठे निर्णय घ्यावे व तात्काळ निर्यात बंदी उठवावी असे मत कांदाऊत्पादक शेतकरी शितल गोरे यांनी व्यक्त केली.
