तुळजापूर (प्रतिनिधी) - तिर्थक्षेञ तुळजापूर येथे कालभैरव जयंती मंगळवार दि. 5 डिसेंबर रोजी विविध धार्मिक विधी करण्यात येवुन पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

तिर्थक्षेञी तुळजापूर क्षेत्री 8 भैरवांचे स्थाने आहेत. त्यात कालभैरवचे स्थान डोंगराच्या कड्यावर आहे. मंगळवार दि. 05 डिसेंबर रोजी सकाळी श्री काळभैरव जन्माष्टमीनिमित्त तैल अभिषेक करण्यात आले. नंतर कालभैरव मुर्तिस वस्ञोलंकार घालण्यात येवुन आरती करण्यात आली. नंतर दुपारी काळभैरव अनुष्ठान यज्ञ आरंभ झाला. नंतर  1008 कालभैरव अष्टकांची अनुष्ठान यज्ञ व होम हवन विधी केला गेला. सांयकाळी श्री काळभैरव मंदिर परिसरामध्ये आकर्षक रांगोळी काढण्यात आली. नंतर सायंकाळी पाच हजार दिव्यांचे दीप प्रज्वलन केले. नंतर सामुहीक महाआरती करण्यात येवून दिपोत्सवसाठी तुळजापूर वासीयांनी तुपातल्या वातीच्या पणत्या घेऊन आले होते. दिवसभर कालभैरव दर्शनार्थ भाविकांनी गर्दी केली होती. या जयंती सोहळा यशस्वीतेसाठी श्री. काळभैरवनाथ मंदिर संस्थान, तुळजापूर भिंडोळी उत्सव समिती, तुळजापूर. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, तुळजापूर यांनी परिश्रम घेतले.


 
Top