तुळजापूर (प्रतिनिधी) - शहरातील विविध विद्युत दिवे बऱ्याच दिवसांपासून लाइट रात्रंदिवस सुरुच राहात असल्यामुळे विजेचा अनाठाई वापर होत आहे. नगर परिषदेच्या विद्युत विभागाने याची तत्काळ दखल घेऊन अनाठाई विजेचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी शहरवासियांमधुन केली जात आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूरात तुळजापूर विकास प्राधिकरणांतर्गत कोट्यावधी रुपये खर्चुन अंडरग्राऊंड विद्युत योजना कार्यान्वित केली आहे. तरीही गेली अनेक महिन्या पासुन शहरातील पथदिवे 24 घंटे चालुच राहत आहे. तिर्थक्षेञ तुळजापूरात नगरपरिषद पथदिव्यांचा थकबाकी पोटी अनेक वेळा विद्युत प्रवाह खंडीत केला होता. तरीही शहरातील बहुतांशी पथदिवे चोवीस चोवीस घंटे सुरू असुन आहेत. नगर पालिकेला कुठलेही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. राज्यात सर्वत्र विजेचा तुटवडा असल्याने विजेच्या लपंडावाबाबत सर्वत्र ओरड सुरु आहे. अशातच येथील कारभार मात्र लख उजेडात सुरू असल्याचा आरोप सुज्ञ नागरिक करीत आहेत. न.प. विद्युत विभाग व मेन्टेनन्स कर्मचाऱ्यांनी याची तत्काळ दखल घेऊन होणाऱ्या विजेचा अपव्यय त्वरित थांबवावा, अशी मागणी
होत आहे.