परंडा (प्रतिनिधी) - जगातील सगळ्यात मोठा पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड याठिकाणी आपले बहुमत सिद्ध करून दाखवले. याचा आनंदोत्सव भाजपा, परंडा तालुक्याच्या वतीने पेढे वाटून व फटाके वाजवून साजरा केला.

 यावेळी परंडा न.प. मा.उपनगराध्यक्ष सुबोधसिंह ठाकूर, भाजपा तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, शहराध्यक्ष ॲड. संदीप शेळके, बाबासाहेब जाधव, धनाजी गायकवाड, जयवंत पाटील, साहेबराव पाडुळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव बारस्कर, सुजित परदेशी, उमाकांत गोरे, गजानन तिवारी, मनोज पवार, गौरव पाटील, सिध्दीक हन्नुरे, धनंजय काळे, रामकृष्ण घोडके, बबन चौधरी, विठोबा मदने तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 
Top