धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील महात्मा गांधी नगर येथील कुमार व्यास यांच्या निवासस्थानी गीता जयंती साजरी करण्यात आली. गीता ग्रंथाचे पूजन, प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी बोलताना शामराव दहिटणकर म्हणाले गीता ज्ञानेश्वरी हे शास्त्रेश्वर आहेत. यांच्या पुढे कोणताही ग्रंथ नाही. गीता ही संसार जिंकणारे शास्त्र व शस्त्र आहे. ज्या सर्व शक्ती मान भगवंताचे वर्णन वेद करतात तोच प्रत्यक्ष भगवान गीता स्वमुखाने सांगतात. जीवनाचे व आत्मोध्दाराचे तत्वज्ञान विषद करतात. “सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज! अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच:! “असे आश्वासन नि:शंक पणे देतात. सर्वानी गीतेचे पाठण अध्ययन अवश्य करावे. असे आवाहन केले.गीता पठणा साठी 70 जण उपस्थित होते.गीता ग्रुपचे सर्व स्री पुरुष वाचकांनी18 अध्याय गीता व विष्णु सहस्र नामाचे संस्कृत मधुन अस्खलित पठण केले.